देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास; आता दिली ‘ही’ जबाबदारी

हायलाइट्स:

  • पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची तयारी
  • पाच राज्यांसाठी केली निवडणूक प्रभारींची घोषणा
  • देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दिली मोठी जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्रात पाच वर्षे युतीचं सरकार यशस्वीपणे हाताळणाऱ्या व बिहार विधानसभा निवडणुकीत मोलाची कामगिरी बजावणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजप नेतृत्वानं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. पुढील वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुढील वर्षी गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं या निवडणुकांतील यशापयश सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. विशेषत: सत्ताधारी भाजपसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळंच भाजपनं आतापासूनच तयारी केली आहे. या राज्यांतील निवडणूक रणनीती ठरविण्यासाठी भाजपनं देशभरातील अनुभवी व हुशार नेत्यांची निवड केली आहे. गोव्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडं देण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी म्हणून धर्मेंद्र प्रधान काम पाहणार आहेत.

वाचा: महाविकास आघाडीला जेरीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांना Z सेक्युरिटी

फडणवीस यांनी यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखली होती. या निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं होतं. फडणवीस यांच्या याच अनुभवाचा उपयोग गोव्यात करून घेतला जाणार आहे. गोवा हे महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या राज्यात सध्या भाजपचीच सत्ता आहे. मात्र, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक भाजपची महत्त्वाची आहे. त्यामुळंच फडणवीस यांच्याकडं निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे.

वाचा: चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यातील वाद थांबेचना; आता वाघ म्हणाल्या…Source by [author_name]

Leave a Reply