महिन्याचे बाळ आईकडून हिसकावून घेऊन माकड पळाले, आणि…

मऊ (उत्तर प्रदेश): मानवाने जंगले नष्ट करून जनावरांच्या राहण्याच्या जागा नष्ट केल्या. यामुळेच जंगलातील माकडे मानली वस्त्यांमध्ये येऊ लागल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. मऊच्या घोसी बाजारात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे सर्वांचीच झोप उडाली. येथे एका माकडाने आईजवळ असलेले दुधावरचे मूल हिसकावून पळवून नेले. मुलाला माकडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी सर्वांनी माकडाला घेरले, तेव्हा कुठे माकडांनी या चिमुकल्याला सोडून दिले. यामध्ये ते लहान मूल जखमी झाले. उपचारासाठी त्याला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घोसी बाजार परिसरात शनिवारी पुष्पा नावाची एक महिला आपल्या मुलासोबत घराच्या मुख्य दारापुढे बसली होती. त्यावेळी एक माकड एका झटक्यात जवळ येत तिच्याजवळून तिचे मूल घेऊन पळून गेला. आरडाओरडा झाल्यानंतर स्थानिकांनी माकडाला घेरले. त्यानंतर तो त्या मुलाला तेथेच जमिनीवर सोडून पळून गेला. माकडाला या मुलाला चावा देखील घेतला होता. यात हे मूल गंभीर जखमी झाले.

घोसी येथे माकडांच्या दहशतीचे हे काही पहिलेच उदाहरण नाही. येथे माकडांनी १२ हून अधिक लोकांना जखमी केल्याची माहिती स्थानिक सांगतात.

क्विक करा आणि वाचा – ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या मागणीवरून ओवेसी भडकले, म्हणाले…

सतत नष्ट होणाऱ्या दंगलांचा हा परिणाम

माकडांच्या या हिंसक कारवायांबाबत पर्यावरण विशेषज्ञ डॉ. अचलकुमार सिंह यांनी आपले मत व्यक्त केले आहे. गेल्या काही दशकांमध्ये माकडांनी मानवी वस्त्यांमध्ये स्थलांतर केले आहे. नैसर्गिक अधिवास नसल्याने त्यांना खाण्यापिण्याच्या समस्या उद्भवतात. सामान्य वर्तनात बदल झाल्यामुळे ते हिंसक होता. जंगलतोड देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने माकडे आणि बिबटे मानवी वस्त्याकडे येतात आणि नुकसान करतात, असे सिंह म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा – coronavirus in india: देशात करोना रुग्णांची संख्या ९० लाखांच्या वर, २४ तासांत ५०१ मृत्यू
क्लिक करा आणि वाचा – राजस्थान: ब्रिटिश नागरिकाला डेंग्यू, मलेरिया आणि करोना; नंतर नागाने दंश केला आणि…Source by [author_name]

Leave a Reply