लज्जास्पद! मुंबईतील धारावीत २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : घराबाहेर खेळणाऱ्या मुलींना चॉकलेटचे आमीष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना धारावीत घडली. धारावी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्या नराधमाला ताब्यात घेतले आहे.

धारावीत राहणाऱ्या सात ते आठ वर्षांच्या चार मुली घराबाहेर खेळत होत्या. याच परिसरात राहणाऱ्या एकाने त्यांना चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. त्यापैकी दोन मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो पसार झाला. त्या मुलींनी आपल्या घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला.

२० नोव्हेंबर रोजी दोन्ही मुलींच्या कुटुंबांनी धारावी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक वाणी यांचे पथक या नराधमाच्या मागावर असताना सायन परिसरातील नातेवाईकांकडे तो आल्याचे समजले. तेथेच त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या.

अर्णब गोस्वामींच्या अर्जावर मुंबई कोर्टात १ डिसेंबरला सुनावणी

रात्री दुकान बंद करून गेला, मालकानं सकाळी येऊन पाहिलं तर…

मुंबईतील इव्हेंट मॅनेजर तरुणीवर दिल्लीत बलात्कार, दोघांना अटकSource by [author_name]

Leave a Reply