संघात स्थान न दिल्याबद्दल रोहित शर्माने सोडले मौन, केला मोठा खुलासा

रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. बीसीसीआयने रोहित दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले होते. पण रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सबरोबर सराव करत होता. त्यानंतर रोहितला कसोटी संघात स्थान देण्यात आले. याबाबत पहिल्यांदाच रोहितने आपले मौन सोडले आहे. त्याचबरोबर काही खुलासेही रोहितने यावेळी केले आहेत.

रोहित म्हणाला की, ” तुम्हा सर्वाांना खरं सांगतो, त्यावेळी नेमकं काय घडत होतं, याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. पण सर्वजणं माझ्याबाबत चर्चा करत होता आणि चाहत्यांनीही मला केंद्रस्थानी ठेवलं होतं. पण त्या काळात मी बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्स यांच्या कायम संपर्कात होतो. मला दुखापत झाली होती. पण मी मुबंई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की, मी मैदानात उतरू शकतो. कारण ट्वेन्टी-२० हा क्रिकेटचा लहान प्रकार आहे आणि मी ही परिस्थिती सांभाळू शकतो. मी जेव्हा शांतपणे विचार केला तेव्हा मला समजले की, मला नेमकं काय करायचं आहे. त्यानुसार मी वागत गेलो.”

रोहितचे पायांचे स्नायू आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखावले गेले होते. त्यामुळे रोहितला काही सामने खेळता आले नव्हते. त्यामध्येच बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी आपले तिन्ही प्रकारचे संघ जाहीर केले. यामध्ये एकाही संघात रोहितला स्थान देण्यात आले नव्हते. पण त्याच रात्री रोहित शर्मा हा सरावासाठी मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये गेला होता. त्यामुळे चाहत्यांनी बीसीसीआय आणि निवड समितीला ट्रोल केले होते. त्यानंतर रोहितला कसोटी संघात स्थान देण्यात आले होते.

दुखापतीबाबत काय म्हणाला रोहित, पाहा…

रोहित शर्मा

माझ्या पायांचे स्नायू दुखआवले गेले होते, पण सध्याच्या घडीला मी ठिक आहे. मी सध्याच्या घडीला फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. जेव्हा मी क्रिकेट खेळायला मैदानात उतरेन, तेव्हा मला कुठलीही समस्या जाणवायाल नको. त्यामुळेच मी आता जास्त मेहनत घेत आहे. माझ्याबाबत लोकं काय बोलतात, याचा मला काहीही फरक पडत नाही. जोपर्यंत तुम्ही मैदानात उतर नाही तोपर्यंत तुमचे शरीर कसे आकार घेईल, हे माहिती नसते. आता मला कसोटी सामने खेळण्यापूर्वी काही दिवसांच अवधी मिळाला आहे. या कालावधीमध्ये मी अधिक तंदुरुस्त होण्यावर भर देणार आहे. कसोटी क्रिकेट सुरु होण्यासाठी आता बराच अवधी आहे, त्यामुळे मी ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघाबाबत जास्त विचार केला नाही, असे रोहितने सांगितले.Source by [author_name]

Leave a Reply