सर्वसामान्यांचा लोकल प्रवास लांबणीवर?; महापालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईः लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबईतील लोकलची दारे अद्याप सर्वसामान्यांसाठी बंदच आहेत. सरकारनेही रेल्वेकडे सर्वसामान्यांनाही लोकलमध्ये परवानगी द्यावी यासाठी रेल्वेकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, मुंबईतील करोना रुग्णांची वाढ पुन्हा होत असताना पुन्हा सर्वसामान्यांचा लोकल प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

दिवाळीनंतर लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दिवाळीत बाजारात झालेली गर्दी, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळे नियंत्रणात आलेला करोना पुन्हा डोके वर काढत आहे. मागील पाच दिवसांत मुंबईत रुग्णांची संख्या दुपटीने वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळं पालिकेनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दिवाळीनंतर आम्ही लोकल ट्रेन, स्विमिंग पुल आणि शाळा सुरु करण्याचा विचार आम्ही केला होता. मात्र, आता हे सर्व बंदच राहणार आहे. तीन ते चार आठवड्यांत मुंबईतील करोनाची स्थिती कशी आहे, याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती इक्बाल चहल यांनी दिली आहे.

वाचाः मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्याला करोना

मुंबईत सध्या तरी कोणतेही निर्बंध घालण्यात येणार नाहीत. मुंबई ज्याप्रकारे अनलॉक आहे. तशीच राहणार आहे. मुंबईतील करोना स्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. यावरुनच आम्ही स्विमिंग पुल, शाळा व ट्रेन सुरु करण्याची तयारी केली होती. मात्र, देशात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आम्ही आमचा निर्णय रद्द केला आहे, असं चहल यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः पुन्हा सज्जता! मुंबईबाहेरुन येणाऱ्यांच्या चाचण्या, करोना केंद्रे सतर्क

दरम्यान, यापूर्वी गणपती, नवरात्रीत झालेली गर्दी, गाठीभेटी व विनामास्क वावर, तसेच सुरक्षित वावरचा उडालेला फज्जा यामुळे आटोक्यात आलेली संख्या दुपटीने वाढली होती. दिवाळीच्या आधी १६ नोव्हेंबरला रुग्णसंख्या ४०० पर्यंत खाली आली होती. त्यानंतर मागील पाच ते सहा दिवसांत दररोज ४०० ते ५०० रुग्ण वाढत जाऊन एक हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत.

वाचाः राज्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली; ‘ही’ धोक्याची घंटा तर नाही?Source by [author_name]

Leave a Reply